मच्या विषयी
 • You are here:
 •   अंकिता अॅग्रो इंजिनीरिंग

  आपण आमच्या या संकेत स्थळास भेट दिल्या बद्दल धन्यवाद.

  बळीराज्याच्या सेवेत आम्ही मागिल १६ वर्षापासून आहोत, शेतीची मशागत करताना किंवा पेरणी करताना येणाऱ्या अडचणी व त्यामुळे वाया जाणारा वेळ, अनाठाई होणारा खर्च यांचा विचार करता शेतकरी पूर्ण हैराण होत होता. त्यातून मार्ग काढण्यासाठी तांत्रिक दृष्ट्या काही मदत करता येईल का? याचा अभ्यास करून शेतकऱ्याच्या मदतीसाठी आम्ही अनेक सुलभ, सहज हाताळण्याजोगी शेती अवजारे बनविण्यात आम्ही शक्तीचे यशस्वी ठरलो. त्यासाठी शेतजमीन, त्यासाठी कोणता ट्रक्टर वापरतात, कोणते उत्पादन घेतात या सर्वांचाच अभ्यास करून हि शेत अवजारे तयार केली जसे स्वयंचलित(Automatic) पेरणीयंत्र, पंजीपास, थ्रीपास, मोगडी, सरी रिजर, केणी, वखर, हॅरो, डोझर, पल्टी नांगर, हैड्रोलिक पल्टी नांगर, ई. मुळे पैश्याचा व महाग बियाणांचा अपव्यय टळला. शेती व्यवसाय सुलभ, सहज फायदेशीर व्हावा यासाठी आमचे संशोधन व अविरत प्रयत्न चालू आहेत. आमच्या १६ वर्षांच्या अनुभवातून आम्ही १२.५ H.P. ते ७५ H.P. ट्रॅक्टरसाठी सर्व अवजारे बनवितो. आमचे डीलर्स सर्व महाराष्ट्रात आहेत. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरील समाधान हेच आमचे यश.

    पायाभूत सुविधा

  आम्ही 15000 चौरस फूट क्षेत्र व्यापक पसरलेल्या एक आधुनिक उत्पादन प्रकल्प उभारला आहे, ज्याची 90 युनिट स्थापित क्षमता आहे. आमची उत्पादन क्षमता ही आमच्या उत्पादन युनिट मधील विविध युनिटनी केलेल्या कार्यक्षम तसेच समन्वित कामगिरीतून सुधारीत झाले आहे.

  आमच्या उत्पादन युनिट मध्ये स्थापित काही मशीन खालीलप्रमाणे आहेत:

  • वेल्डिंग मशीन
  • लेथ मशीन
  • ग्राइंडिंग मशीन
  • मिलिंग मशीन
  • बेंडिंग मशीन
  • BFW-VMC
  • CNC-Profile Cutting
  • Presses - 200 ton / 50 ton / 60 ton

    ध्येय आणि उद्दिष्ट्ये

  माणसाचे ध्येय जर निश्चित असेल तर तो कोणत्याही संकटाला सहज तोंड देत आपला मार्ग आक्रमित आसतो. अंकिता अॅग्रो इंजिनीरिंग या कंपनीच्या रूपाने १९९६ साली एक छोटेसे रोप आम्ही लावले. शेतकऱ्यांना लागणारी प्रतीनिश्चीत स्वरुपाची अवजारे आम्ही तयार करत असून लाकडी अवजारे मोडल्या नंतर होणारा त्रास लक्ष्यात घेता आम्ही लोखंडी अवजारे बनवू लागलो.त्यात अभ्यास करून नवीन प्रयोग करून आम्ही प्रगत शेती अवजारे तयार करत गेलो व ते शेतकऱ्याच्या शेतीवर जाऊन त्याचा उपयोग कसा करावा? त्याचे फायदे काय? हे शेतकरी बांधूना समजून सांगितले. त्यापासून होणारे फायदे शेतकऱ्याच्या लक्ष्यात आणून त्याच्या अडचणी समजून घेतल्या. ट्रक्टर वापरताना तो कोणत्या कंपनीचा? किती एचपी चा आहे? त्यासाठी युवराज, राजा, राजकुमार, शिलेदार, मनसबदार, ३ एस एल, प्रधान, २ एल यासारखे नांगर तसेच अॅटोमॅटीक पेरणीयंत्र, यासोबत सर्व प्रकारचे बियाणे पेरण्यासाठी स्वतंत्र रोटर संच, ठराविक अंतरावर ठराविक ठिकाणी बियांची लागवड होते त्यामुळे बियाणे वाया जात नाही. योग्य ट्रक्टरला योग्य नांगर लावला म्हणजे व्यवस्थित नांगरण होते. आमचा सेंटर टायर हॅड्रोलिक डिस्क हॅरो टायर वखरन करण्यासाठी हॅड्रोलिक सिलेंडर असल्याने, तो फळबागेत वापरता येतो.गाळात, चिखलात, ढेकळात फसल्यास हॅरो टायर रिवर्स करून मोकळेपणाने पुढे घेऊ शकतो. यासारखे पंजीपास, थ्रीपास, मोगडी, सरी रिजर, केणी, वखर, हॅरो, कल्टीव्हेटर ११/२ फुटी झरी वखर यासारखे शेती अवजारे बनवून शेतकरी बांधवांचा वेळ व पैसा वाया जाणार नाही याची काळजी घेतो.

  शेतकऱ्याच्या अडचणी आमच्या संकेत स्थळावरील चलत चित्र व मार्क वरून ते सहज सोडवू शकतात. आम्ही सदैव शेतकऱ्याच्या मदतीसाठी हजर आहोत. आम्हास फोन करा, आम्ही मदत करू. एवढे करूनही अडचण सुटत नसेल तर आमचा तांत्रिक सहकारी तुम्हाला मदत करेल. शेतकरी समाधानी तर आंम्ही समाधानी. ‘शेतकरी राजा’ हा खऱ्या अर्थाने राजा व्हावा हीच आमची इच्छा आणि अंकिता अॅग्रो इंजिनीरिंगचे उद्दिष्ट.

    संचालक

  अंकिता अॅग्रो इंजीनिअरिंग हा आमचा उद्योग शेती अवजारे बनवतो. शेती व्यवसायात ज्या अडचणी येतात, शेतीची मशागत करताना, पेरणी करताना शेतकऱ्यांना अनेकवेळा त्रास सहन करावा लागतो, यासाठी आम्ही नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून सहज सुलभतेने वापरता येतील असे शेती अवजारे तयार केली व त्यात यशस्वी झालो. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला व माझ्या सहकाऱ्यांना आमच्या मेहनतीचे चीज झाल्याचे समाधान वाटते. मी अंकिता अॅग्रो इंजीनिअरिंगच्या माध्यमातून शेतकरी राजाला नवीन नवीन शेती अवजारे देण्यास सदैव तत्पर असेल.


  डी. एन. पाटील.
  अंकिता अॅग्रो इंजीनिअरिंग

    आमचा नांगर आपण का घ्यावा?
         आपण नांगर घेताना खालील गोष्टींचा विचार करता का?

  • आपला नांगर जमिनीला टेकवल्या बरोबर लागतो का?
  • तासात माती येते का?
  • टायर तासात मोकळे बसते की, बाजूला घासतो?
  • नांगराचे दोन्ही फाळ सारखे कायम स्वरूपी लागतात का? की नांगर घेतल्यानंतर काही दिवसांनी एक लागतो व एक लागत नाही.
  • नांगराचा शाफ्ट तुटतो का?
  • एकेरी डीझेल किती लागतो?
  • नांगराचे पार्ट कोणत्या मटेरियल पासून बनवलेले आहेत? तो लोखंडाचा आहे की पोलादाचा आहे (उदा. शेर पासा फाळ व लेग) हे आपण पहिले का?
  • नांगरट करतांना टॅक्तर मोकळा लागतो की लोडवर येतो?
  • नांगराची थोप किंवा लेव्हल एक सारखी येते का?
  • आपण दिलेल्या पैश्याचा पुरेपूर मोबदला मिळतो का?
  • आपण नांगर रान उकरतो की दिवसभरात कमी नांगरट होते?
  • आपण घेतलेल्या नांगराचे दोन्ही लेग, बेअरिंग, शाफ्ट या महाग वस्तूंची वॉरंटी आहे का?
  • आपण घेतलेला नांगर कायमस्वरूपी गॅरेजमध्ये न्यावा लागतो का?
  • नांगराचे सुटे भाग आपल्याला कायम स्वरूपी उपलब्ध होतात का?
  • नांगराच्या किमतीपेक्षा कितीतरी अधिक पैसे आपण दरवर्षी टायर आणि डिझेलवर घालवतो का?
  • नांगर घेतल्यावर आपल्याला सर्व्हिस मिळते का? कंपनीचा माणूस येऊन नांगर लावून देतो का?

  प्रमाणपत्रे


  मचे क्लायंट